Thursday, July 21, 2022

शास्त्र असतं ते !..

 



प्रसंग : अनेक दिवसांनी आम्ही मैत्रिणी भेटण्याचा योग आलेला.. रुचकर पदार्थांबरोबर गप्पांना एक वेगळीच रंगत आलेली.. नुकतीच दक्षिण भारताची सैर करून आलेली आमच्यातलीच एक.. तिच्या त्या प्रवासाच्या अनुभवांतून तिथली मंदिरे, याचं थांबणारे कौतुक.. आणि त्यावेळी हे सगळं आपणही एकदा पाहायला हवं अशी पुसटशी भावना येऊन गेली..

प्रसंग : पुन्हा एक भेटीगाठींचा दिवस.. पण यावेळी धाकटा भाऊ आणि घरचे  सगळे जमलेले... अशा वेळी गप्पा,चर्चा तर होणारच... भावाशी बोलताना भारताचा इतिहास आणि अशा काही गोष्टींच्या चर्चा आणि त्यातून समोर येणारी काही ओळखीची तर काही अनोळखी चित्रं.. फारसा माहिती नसणारा हा विषय काय आहे ते एकदा बघावं असा एक आलेला विचार...

प्रसंग : whats app  वर नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या groups वर येणारे मूर्ती आणि मंदिरांचे फोटो आणि त्याचं चमत्कारिक explanation  असणाऱ्या posts... मग त्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि ठेवणाऱ्या दोन गटांच्या घनघोर चर्चा.. आता हा सगळा काय प्रकार आहे ते एकदा बघावंच असा विचार strongly येतो...

एकंदरीतच इतिहास आणि त्याच्याशी related विषय तुकड्यातुकड्यांनी  माझ्या समोर येत होते. ही एक स्वतंत्र ज्ञान शाखा( branch of knowledge ) आहे याची मला गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे याबद्दलच्या अनेक facts अभ्यासता येतील याचा विचार सुद्धा मी केला नव्हता. पण Indology किंवा भारतशास्त्र म्हणजे खरंच काय हे शोधताना आणि नंतर त्याचा अभ्यास करताना अनेक अज्ञात गोष्टी समजू लागल्या आणि या विषयाच्या व्याप्तीने, पसाऱ्याने मी अवाक्  झाले.

प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे prehistoric period  पासून १२ व्या शतकापर्यंतचा  इतिहास म्हणजे Indology चा अभ्यास. या पूर्ण कालखंडात भीमबेटकाच्या गुहांमध्ये राहणारी भटकी लोकं आहेत. सिंधु सरस्वतीच्या कुशीतून बहरलेली पहिली नागरी संस्कृती (urban civilization ) आहे. त्यानंतर गंगेकाठी सुरुवात होऊन बलाढ्य झालेले दुसरे नागरीकरण ( second urbanization ) आहे. अनेक साम्राज्ये आणि सम्राटांचा उदयास्त आहे. जगाला नवीन विचारसरणी देणारे भारतात निर्माण झालेले जैन आणि बौद्ध धर्म आहेत. हिंदू धर्म त्यातले पंथ, वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत. काळ बदलताना विचारांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये झालेले बदल आहेत. महाकवि कालिदास, नाटककार भास यांचे अलौकिक साहित्य आहे. सिंधु संस्कृतीमधील मातृदेवतेच्या ओबडधोबड शिल्पांपासून ते मूर्तीकला आणि मंदिर स्थापत्याचा ( temple architecture ) अत्युच्च अविष्कार असणारी खजुराहोची मंदिरे आहेत.

काळाच्या उलट्या प्रवाहाची ही वाट मोठी मनोरंजक आणि विलक्षण आहे. या वाटेवर अनेक चित्तवेधक, चक्रावून टाकणाऱ्या, थक्क करणाऱ्या, मानवच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देणाऱ्या गोष्टी दिसतात. या वाटा धुंडाळताना आपणही अलगदपणे त्या वाटेवरचे वाटसरू होऊन जातो.

एकूण काय तर हा प्रवास अविरत आहे. It’s not destination, its journey……..

 

- विनिता हिरेम


No comments:

Post a Comment

१. अद्भुत आणि रंजक

सन १९५७ . दिल्लीहून निघालेली एक रेल्वे भोपाळच्या दिशेने वेगात निघाली होती .   या गाडीचा वेग भोपाळ स्टेशन येण्याआधी थोडा कमी ...